१) माणसे दूर जातात... तेच नैसर्गीक? त्या नीसर्गक्र्मात अधीक जवळ येणे ही प्रक्रीयाच नाही? जीव गर्भाशयातुन बाहेर पडतो; नाळ तुटते; आणी मग पुढील आयुष्यात एक अदृश्य नाळ पुन्हा पुन्हा तुटत राहते...... कधी वेदना जाणवतात, कधी जाणवत नाहीत. पण त्या मानत रुजलेल्या असतातच.
२) आठवणींचा खड़ा पहरा असेल तर स्वताच्या आयुष्यात कसे शीरायचे?
३) पुढे जायच असेल तर इतक पुढे जाव की मागच काही दीसूच नये.
४) "आणखी काय हव?" म्हणजे "आणखी कही नको आहे" अस नव्हे तर "आणखी काहीतरी नक्कीच हव" अस उत्तर त्या प्रश्नातुन ध्वनीत होते.
५) "शांती" तुमच्या आत असते. ती काही एखादी भेट म्हणून तुम्हाला कोणी आणून देत नाही. शोध घ्या.... घेत राहा....
६) खरा न्याय इतरांच्या परभावत नसतो. तो कुणावर वीसंबन्याताही नसतो. तो असतो जे घडते आहे त्याला धीराने सामोरे जाण्यात. स्वतावर वीश्वास ठेवून, मनातील आशा जागी ठेवून पुढे जाण्यात.
७) "मैत्री" कशी वाहत्या झ्र्यासाराखी पाहीजे. तीच्यात न्हाताना स्वच्छ, प्रसन्न वाटल पाहीजे.