Monday, August 25, 2008

$$$$$ दोन गुलाब $$$$$

आमच्या घरी दोन प्रकारची गुलाबाची झाडे आहेत. एक मी पसंद केलेल आणी एक त्याने पसंद केलेल. दोनही झाडांना अगदी छान भरपूर फूले येतात. जेव्हा पहील्यांदा त्याने मला ही फुलझाडे घेउन दीली तेव्हा मी मनात म्हटले की ही झाडे जगली, जर या झाडांना बहर आला तरच मी समजेन की आमचे नाते शुद्ध, नीतल आणी पवीत्र आहे. आणी अगदी तसेच झाले. फुलझाडे फुलली, त्यांना बहर आला. सुंदर सुंदर फूले त्याला आली. जणू त्याच्या माज्या मैत्रीच्या झाडाला आलेली प्रेमाचीच फूले ती !!!
त्या वेगवेगल्या दोन झाडांच्या फुलांचे नीट नीरीक्षण केले असता कलुन येते की ती फूले त्याचा माझा स्वभाव वर्णन करीत आहेत. मी पसंद केलेल्या झाडाला जेव्हा कली येते तेव्हा त्या कलीचा रंग हलकासा पीवला असतो. मग त्या कलीचे फुलत रूपांतर होताना त्याचा रंग गडद पीवला होतो. त्यानंतर ते फुल जेव्हा पूर्णपणे वीकसीत होते तेव्हा त्याला गुलाबी रंग चढू लागतो. मग दोन दीवसांनी पीवला रंग पूर्णपणे नाहीसा होउन त्याला संपूर्ण गुलाबी रंग येतो. आणी मग आणखी दोन दीवसांनी त्याला लाल रंग चढू लागतो. शेवटी जेव्हा ते फुल पुर्णतः फुलून, त्याचा सुगंध सर्वांना देऊन गलन्याच्या मार्गावर असते तेव्हा त्याला लाल रंग उरतो. इथेच त्या फुलाचा शेवट होतो.
त्याने पसंद केलेल्या झाडाच्या फुलला सुरुवातीपासुनच गुलाबी मोहक फूले येतात. त्या फुलांना नंतर लाल रंग चढू लागतो. शेवटी त्या फुलांचाही संपूर्ण रंग लाला होतो.
मैत्रीचे प्रतीक असलेले पीवले गुलाब, प्रेमाची हलकीशी जाणीव करून देणारे गुलाबी गुलाब अतीव, नीर्मल, शुद्ध प्रेम जपणारे सुंदर लाल गुलाब हा सारा तर माझ्या जीवनाचा प्रवास आहे. उलट प्रेमापासून सुरू होउन प्रेमाच्या उंच शीखरापर्यंत जाणारा त्याचा जीवनप्रवास.

ती फूले आम्हा दोघांनाही पूरक आहेत.

No comments: