Friday, August 29, 2008

काही ओळी

१) माणसे दूर जातात... तेच नैसर्गीक? त्या नीसर्गक्र्मात अधीक जवळ येणे ही प्रक्रीयाच नाही? जीव गर्भाशयातुन बाहेर पडतो; नाळ तुटते; आणी मग पुढील आयुष्यात एक अदृश्य नाळ पुन्हा पुन्हा तुटत राहते...... कधी वेदना जाणवतात, कधी जाणवत नाहीत. पण त्या मानत रुजलेल्या असतातच.

२) आठवणींचा खड़ा पहरा असेल तर स्वताच्या आयुष्यात कसे शीरायचे?

३) पुढे जायच असेल तर इतक पुढे जाव की मागच काही दीसूच नये.

४) "आणखी काय हव?" म्हणजे "आणखी कही नको आहे" अस नव्हे तर "आणखी काहीतरी नक्कीच हव" अस उत्तर त्या प्रश्नातुन ध्वनीत होते.

५) "शांती" तुमच्या आत असते. ती काही एखादी भेट म्हणून तुम्हाला कोणी आणून देत नाही. शोध घ्या.... घेत राहा....

६) खरा न्याय इतरांच्या परभावत नसतो. तो कुणावर वीसंबन्याताही नसतो. तो असतो जे घडते आहे त्याला धीराने सामोरे जाण्यात. स्वतावर वीश्वास ठेवून, मनातील आशा जागी ठेवून पुढे जाण्यात.

७) "मैत्री" कशी वाहत्या झ्र्यासाराखी पाहीजे. तीच्यात न्हाताना स्वच्छ, प्रसन्न वाटल पाहीजे.

Monday, August 25, 2008

$$$$$ दोन गुलाब $$$$$

आमच्या घरी दोन प्रकारची गुलाबाची झाडे आहेत. एक मी पसंद केलेल आणी एक त्याने पसंद केलेल. दोनही झाडांना अगदी छान भरपूर फूले येतात. जेव्हा पहील्यांदा त्याने मला ही फुलझाडे घेउन दीली तेव्हा मी मनात म्हटले की ही झाडे जगली, जर या झाडांना बहर आला तरच मी समजेन की आमचे नाते शुद्ध, नीतल आणी पवीत्र आहे. आणी अगदी तसेच झाले. फुलझाडे फुलली, त्यांना बहर आला. सुंदर सुंदर फूले त्याला आली. जणू त्याच्या माज्या मैत्रीच्या झाडाला आलेली प्रेमाचीच फूले ती !!!
त्या वेगवेगल्या दोन झाडांच्या फुलांचे नीट नीरीक्षण केले असता कलुन येते की ती फूले त्याचा माझा स्वभाव वर्णन करीत आहेत. मी पसंद केलेल्या झाडाला जेव्हा कली येते तेव्हा त्या कलीचा रंग हलकासा पीवला असतो. मग त्या कलीचे फुलत रूपांतर होताना त्याचा रंग गडद पीवला होतो. त्यानंतर ते फुल जेव्हा पूर्णपणे वीकसीत होते तेव्हा त्याला गुलाबी रंग चढू लागतो. मग दोन दीवसांनी पीवला रंग पूर्णपणे नाहीसा होउन त्याला संपूर्ण गुलाबी रंग येतो. आणी मग आणखी दोन दीवसांनी त्याला लाल रंग चढू लागतो. शेवटी जेव्हा ते फुल पुर्णतः फुलून, त्याचा सुगंध सर्वांना देऊन गलन्याच्या मार्गावर असते तेव्हा त्याला लाल रंग उरतो. इथेच त्या फुलाचा शेवट होतो.
त्याने पसंद केलेल्या झाडाच्या फुलला सुरुवातीपासुनच गुलाबी मोहक फूले येतात. त्या फुलांना नंतर लाल रंग चढू लागतो. शेवटी त्या फुलांचाही संपूर्ण रंग लाला होतो.
मैत्रीचे प्रतीक असलेले पीवले गुलाब, प्रेमाची हलकीशी जाणीव करून देणारे गुलाबी गुलाब अतीव, नीर्मल, शुद्ध प्रेम जपणारे सुंदर लाल गुलाब हा सारा तर माझ्या जीवनाचा प्रवास आहे. उलट प्रेमापासून सुरू होउन प्रेमाच्या उंच शीखरापर्यंत जाणारा त्याचा जीवनप्रवास.

ती फूले आम्हा दोघांनाही पूरक आहेत.

Friday, August 22, 2008

प्रेमाचे बंध !!!

सज्ज आहेत आई बाबा,
माज्या लग्नाचा बार उद्वायाला,
आता तरी ये मनराजा,
लावू नको वाट पहायला.



पाहीली वाट तूजी कीती,
झाले आता मी परकी,
नकळत येता आठवण तुज़ी,
येतो एक प्रश्नमनी.

काय होते कारण तुज्या येण्याला?
वीचारून थकले वेड्या मनाला,
सांग परी मनराजा,
का दीलास दगा मला?

वीसरालास का त्या आणा-भाका,
घेतल्या होत्या आपण द्होघा,
'मरके भी कभी होंगे जुदा'
राहू एकमेकांच्या हृदयात सदा.

आहे हे वीसराने कठीन,
पण तरीही प्रयत्न करेन,
तूला मनातून काढून,
त्यांना हृदयात ठेवीन.

केले त्यांनी मला पत्नी,
झालो सात जन्माचे साथी,
होणार नाही मी तुझी,
कदाचीत आठव्याही जन्मी.

ठावूक असुनही सर्व काही,
दीला प्रेमाचा सागर त्यांनी,
पुर्त न्हाले मी त्यातुनी,
झाले मी त्यांची ऋणी......