Thursday, October 16, 2008

एक दीवस

एक दीवस असा येइल,
मज्याकडे भरपूर कामं असतील.
एक दीवस असा येइल,
मला अमाप फायदा होइल.
एक दीवस असा येइल,
मी खूप-खूप आनंदी असेन.
मी माझी सगळी कर्तव्य,
पार पडलेली असतील.
एक दीवस असा येइल,
हे सगल, सर्वस्व इथे असेल,
पण मीच नसेन.......

*********** मी ***********

मी असा फुलून आलो,
जेव्हा तू बहार झालीस,
कधी चांदणे तू व्हावे,
अन मी ते पांघरावे.


मी असा मोहरून गेलो,
जेव्हा तू सुगंध झालीस,
कधी पाउस गाणे तू व्हावे,
अन मी वाहत जावे.

भीजल्या भावनांना स्पर्शावे,
कधी मी सारे वीसरावे,
अन तू आठवावे.

Tuesday, September 16, 2008

नाती !!!

मनाच्या जीवलग नाती;
ज्या देतात जीवनाला गती;
नसतात त्यांना कुठल्याही अटी;
ते जगतात फक्त प्रेमापोटी।

ऊन पावसाच्या भेटी

ऊन पावसाच्या भेटी,
झाल्या मनी ह्या श्रावन्मासी,
तू का जलधारा झालीस होती.

चींब चींब झाले स्वपन्,
भीजला हीरवा रंग,
तू का ऊशीरा आलीस होती.
माल पकश्यांची गगनात हींदोलते,
तीन्ही सांजेला...
तुझ्या आठवणींची गर्दी होते.
हीरवे मन, हीरवा चूडा,
हीरवे स्वप्न, हीरवा जीव्हाला,
रान फुलांची, गडद रंगाची,
कीनार कडा, तर कुठे मधेच पुंजका,
ओल्या वार्यावर, तेवतो जसा स्वप्न दीवा.

Monday, September 15, 2008

तू नसतेस तेव्हा...

तू नसतेस तेव्हा बऱ्याच,
गोष्टींची कमतरता जाणवते.
तू हवी-हवीशी वातन्यासाठी,
तू काही काळ जवळ,
नसावीस वाटते.
तूझी उणीव, 'आठवणी',
भरून काढायचा प्रयत्न करतात
मात्र 'आठवणी' मनासारख्या वागतात,
त्यामुले रुसव्या-फुगव्या पासून,
वंचीत झाल्या सारखे वाटते.

तू नसतेस तेव्हा...

Thursday, September 11, 2008

तू...

सतत जवळ नसल्यामुळे,
आकर्षक तू...
क्षन्भारासाठी समजून घेणारी तू...
केव्हा तरीच्या मुलाखातीत,
फुलणारी तू...


माज्या बाबतीत 'तेच'
अनुभव भोगनारी तू...
प्रत्यक्षात नवरा-बायको
झाल्यावर, रुसणारी तू...
रागावणारी तू...
सतत हुतू-तू... खेलनारी,
मी आणी तू...
आयुष्याच्या लांब प्रवासाला,
नीघनारे मी तीथे तू...
कींवा तू तीथे मी...

Friday, September 5, 2008

मराठी साहीत्य


अजून एक आठवण
वीसरयाची म्हणून न जपलेली
अशीच एक वेदना
समजुतदारपणे झोपलेली

अशी एक रात्र हवी
ज्याला पहाट जोडलेली नाही
अश्क्यातील गोष्ट आहे
पण मी आशा सोडलेली नाही.

सगळ तुला देऊन पुन्हा
माजी ओंन्जल भरलेली
पाहील तर तू तुजे ओंन्जल
माज्या ओन्न्जलीत धरलेली.

तरसन्याचा अनुभव मी
आभाळ बरसताना घेतला
तू नव्हतीस तर प्रत्येक थेंब
माज्या अंगोपांगी रूतला

आता मलाही जमायला लागलय
तुज्यासारख वागणं
समोर असल की गप्प राहण
रात्री कुढत जागण.

जेव्हा तू माज़ा
अलगद हात धरलास
खर सांग तेव्हा तुज्याजवल
तू कीतीसा उरलास?
पुसणार कोनी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरणसुध्हा व्यर्थ आहे.